पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/340

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. साऱ्या हिंदुस्थान देशांत एकच धर्म प्रचलित असता, व तेथील प्रचंड लोकसमाजाच्या धार्मिक आकांक्षा व कल्पना, त्याच्यांतच समाविष्ट होण्यासारख्या असत्या, तर मोठे भाग्याचे झाले असते. पण वस्तुस्थिती अगदी उलट असल्याने, आमी जास्त नेटाने प्रयत्न करून आमच्या मार्गात येणाऱ्या अडचणी व अंगीकृत कार्याचा नाजुकपणा यांना आहारी न जातां, इष्ट हेतू साध्य केला पाहिजे. नुकतेच जे अनिर्वचनीय व घोर राजद्रोहाचे गुन्हे घडून आले आहेत, त्यांच्यावरून आपणांला खरा व सतत झटून प्रयत्न करण्याला तात्काल प्रेरणा झाली पाहिजे आणि आपणांसमोर असलेल्या या वादग्रस्त प्रश्नाचे खरें महत्त्व कितपत आहे याची आपणांस पुरी जाणीव पटली पाहिजे. हिंदुस्थानांत सरकाराकडून विद्यादानाची जी अत्युत्तम देणगी दिली जात आहे, तिच्याबरोबरच योग्य अशा धार्मिक व नैतिक शिक्षणाचा लाभ मिळण्यास कसूर होणार नाही, हे पाहण्याचे सरकारचे काम आहे. आमचे सरकार दयावंत आहे तेव्हां त्याच्या उत्कट साहाय्याने ही धार्मिक शिक्षणरूपी नाव, चांगली हाकारिली जाईल, आणि तिचे सुकाणू यश प्राप्त होईल अशा रीतीने धरिलें जाऊन, शेवटी ती नाव सर्व अडचणींतून पार पडून, सुखरूपपणे यशःप्राप्तिरूपी परतीराला लागलेली पाहण्याचा सुखाचा दिवस उजाडण्याला उशीर लागणार नाही, अशी मला उमेद वाटते. ३२०