पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/339

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इंग्रज लोकांतील शिक्षण. प्रयत्न सुरू आहेत. बनारस येथील 'सेंट्रल हिंदू कॉलेज' ही संस्था या दिशेने प्रयत्न केल्यास कितपत यश येईल याचा एक चांगलाच नमूना आहे. यासंबंधांत मुसलमानी संस्थांचा विशेषसा उल्लेख मी करू इच्छित नाही. कारण, त्यांच्यांत धर्म व तत्संबंधी शिक्षण, हा प्रश्न, अधिक सुलभ आहे. परंतु वर सुचविल्याप्रमाणे निरनिराळ्या पंथांच्या मूळ तत्त्वांच्या पायावर ही सारी स्थानिक व वैय्यक्तिक उदाहरणे उभारलेली आहेत. तेव्हां ।। सरकार व सर्व जनता, यांनी, ही चळवळ स्वतः हाती घेऊन, ती इतकी उन्नत व कार्यक्षम केली पाहिजे की, तिच्या द्वारें १ आमची वाढती पिढी अधिकाधिक स्थिर स्वभावाची, आणि परमेश्वराचे भय बाळगणारी होत जाईल, हे मला हवे आहे. मी या प्रश्नाविषयीं दीर्घकाल व सूक्ष्म विचार करीत आलो आहे. आणि कौन्सिलामध्ये व त्याच्या बाहेरही, सरकारचे त्यांतही, ज्यांच्या हाती शिक्षणसंबंधी धोरण कायम करण्याची सूत्रे आहेत अशांचें-व बहुजनसमाजाचे लक्ष या विषयाकडे वेधण्याच्या प्रत्येक संधीचा, मी फायदा घेत आलो आहे. हिंदुस्थानाच्या ज्या भागांतून मी आलो आहे, तेथील हल्लीच्या युनिव्हर्सिटाच्या शिक्षणपद्धतीच्या क्रमांतून निघालेल्या मंडळीची, या बाबतींत मजशी सहानुभूती नाही, हे पाहून मला निराशा वाटते. ही गोष्ट अत्यंत आवश्यक व तशीच ती साध्यही आहे हा विचारच, त्यांना मिळालेल्या शिक्षणामुळे मान्य होणे दरापास्त दिसते. ३१९