पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सरा. . गाया भाग दुसरा. फ्रान्सचा दक्षिण भाग. 'हा आकाशाचा अंडकटाह-घुमट-किती तरी सुंदर दिसतो. आणि तसेंच हे उच्चनीच पर्वतभाग व सूर्यप्रकाशानें प्रदीप्त झालेला हा सागर !' वर्ड्सवर्थ. 'तटबंदी व बुरूज असलेली शहरे आणि जनसमूहाचा संकीर्ण नाद यांची आम्हांला मजा वाटते.' मिल्टन. _ मार्सेलिस बंदरांत उतरतांच तेथील रस्त्यांतील गर्दी व रहदारी, या गोष्टी आमच्या विशेष निदर्शनास आल्या. रहदारीच्या रस्त्यावर किती तरी गर्दी होती. सर्वांचे पोषाक एकजात काळसर रंगाचे होते. पूर्वेकडील शहरांमध्ये दृष्टीस पडणाऱ्या रंगी बेरंगी व चटकदार पोषाखांशी तुलना केली असतांना हे जरा विलक्षण वाटले. रस्ते फरसबंदी आहेत. त्यांच्यावर बुटांचा टपटप आवाज होत असलेला चमत्कारिक वाटला. हिंदुस्थानांत लष्कर रस्त्यावरून जातांना असा आवाज ऐकू