पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/336

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. तीत जो मनःपूर्वक प्रयत्न केला जात आहे, त्याला, ही पंथबाहुल्याची सबब बाधक होऊ देणे योग्य नाही. हे प्रयत्न इंग्लंडांत व युरोपांतील इतर देशांमध्ये, मुख्यतः अमलांत आणले जात आहेत ते विशिष्ट पंथवाल्यांनी चालविलेल्या शाळांमध्येच, हे खरे. अशा शाळांना सार्वजनिक साहाय्य मिळत असते. हिंदी लोकांनीही अशाच त-हेच्या संस्था चालविण्याचा प्रयत्न करणे अवश्य असले तरी, तिकडे खऱ्या सार्वजनिक व सार्वत्रिक उपयोगाच्या चळवळींना यश येण्याला, जोराची सार्वजनिक जागृती झाली पाहिजे. पण ती होण्याचे दिवस येण्याला किती तरी अवकाश आहे, हे विसरता कामा नये. हिंदुस्थान देश अफाट आहे; आणि अशा बाबतीत पुष्कळच संघटक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. तेव्हां साऱ्या देशभर सर्वसाधारण प्रगती होण्यासाठी, कांही सुद्धा करावयाचे म्हणजे, त्याचा प्रारंभ व पुढील एकसारखें साहाय्य,सरकराकडूनच व्हावे लागते. आजकाल आमच्या मुलांना में शिक्षण दिले जाते आहे, त्याच्या योगाने त्यांच्या मनांत, त्यांचा स्वधर्म व पूर्वापार चालीरीती इत्यादिकांविषयी आदर कसा तो मुळींच राहात नाहा. याचा परिणाम फारच अनिष्ट व दुर्दैवाचा होत असून त्याचा आह्मां लोकांना अधिकाधिक धिक्कार व तिरस्कार वाटतो आहे. तिकडे अलीकडे प्रादुर्भूत झालेल्या अनिष्ट अडचणी तरी धर्माची शिक्षणाशी जी फारखत झालेली आहे, तिचाच ३१६