पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/335

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इंग्रज लोकांतील शिक्षण. तें शिक्षण त्यांना दिले गेलेच पाहिजे, अशी त्यांची पक्की समजूत आहे. - असे असूनही सुदैवाने ज्यांच्या जीवनचर्येच्या नेतृत्वाचे महत्त्वाचे काम ईशसत्तेनें ब्रिटिशांच्या हाती आलेलें आहे अशा हिंदुस्थानांतील वाढत्या पिढीच्या शिक्षणक्रमामध्येही, धर्मासंबंधी शिक्षण अंतर्भूत असणे अवश्य आहे, ही गोष्ट ब्रिटिश राष्ट्राच्या परिस्थितीत वाढलेल्या लोकांच्या कशी ध्यानात येत नाही, याचे मला फार आश्चर्य वाटते. हिंदुस्थानांतील प्रजेमध्ये . धर्माचे निरनिराळे पंथ प्रचलित असल्याने सरकारी देखरेखीखाली धार्मिक शिक्षण देण्याचे काम कठिण आहे, असे म्हणण्यांत येते. पण इंग्लंडांत ख्रिस्ती धर्माचे निरनिराळे पंथ व प्रकार सुरू असूनही, तेथील प्रत्येक शाळेंत व कालेजामध्ये धार्मिक शिक्षण दिले जात आहे. तिकडील सर्वसाधारण जनसमूहाला परधर्मसहिष्णुतेचा धडा अलीकडेच मिळालेला आहे. तरी सुद्धां ही धार्मिक शिक्षणाची पद्धती तेथे चांगली । बिनबोभाट, व समाधानकारक रीतीने काम करीत असल्याचे आढळून आले आहे. उलट हिंदुस्थानांत हिंदुधर्मातील निरनिराळ्या शाखा व पंथ अनादि असून सुद्धां, तो धर्म, इतर सर्व धर्मांहून अधिक परधर्मसहिष्णु असल्याची गोष्ट सर्वमान्य आहे. तेव्हां, आजकाल हिंदुस्थानांतील मुलांना धार्मिक शिक्षण देण्याच्या बाब ३१५