पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/337

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. इंग्रज लोकांतील शिक्षण. मुख्यत्वे परिणाम होत. तरुण मंडळीला परमेश्वराचे भय बाळगण्याचे शिक्षण मिळालेले नसल्याने त्यांना मानवांविषयी आदर वाटेनासा झाला आहे; किंवा निदान पक्षी त्यांच्या मनांतून धार्मिक, सामाजिक, व राजकीय, अधिकाराविषयींचा पूज्य- भाव नष्ट झाला आहे. धर्माच्या बाबतीत हिंदुस्थानसरकारची राजकारणाची वृत्ति सांगून सवरून तटस्थपणाची असल्यामुळे, शिक्षणक्रमामध्ये धार्मिक तत्त्वाचा पूर्ण लोप झालेला आहे. ही 'चालले तसेच चालू दे,' अशा त-हेची राज्यपद्धति हिंदी जनसमूहाला उन्नतीला पोहोचविणारी नव्हे, आणि ह्मणूनच सरकार अलीकडे दीन व मागसलेल्या वर्गातील लोकांना, स्वतःच उत्सुकतेने साहाय्य करूं लागले आहे. ___ या संबंधांत मी नम्रपणे असे सुचवितों की, इतर बाबतीत जी गोष्ट खरी, तीच नैतिक व धार्मिक शिक्षणाच्या संबंधांतही खरी आहे. ह्मणून हे तटस्थ वृत्तीचे धोरण, - खरोखर, कोणा विवक्षित धर्मपंथाच्या संबंधाने ढवळाढवळ न करण्यापर्ते अवश्य राहावें; आणि सर्व मुलांना त्यांच्या त्यांच्या वाडवडिलांच्या धर्माचे शिक्षण मिळण्याची सोय करण्यात यावी. सिंधी व ब्रह्मी लोकांपुरतें हे तत्त्व सरकाराने पूर्वीच मान्य केलेलें आहे. धार्मिक शिक्षण हे इतर शिक्षणाचाच एक अंतर्भत भाग होय, असें सरकाराकडून ठरविले गेल्यावांचून,हिंदुस्थानांत धार्मिक शिक्षण देण्याविषयी प्रांतानिहाय झालेल्या निव्वळ २१