पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/334

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. काही झाले व मटले तरी, प्रत्येक राष्ट्राला धर्माची आवश्यकता असते. या धर्मामुळे नैतिक शास्त्राचे नियम यथाविधि कां पाळले पाहिजेत याची कारणपरंपरा लोकांच्या स्पष्टपणे निदर्शनास आणली जाते. ओजस्वी व सत्यप्रिय असें चारित्र्य बनून येण्याला, धर्म व नीती ही मुख्य व मूळाधार साधने होत. खऱ्या भक्कम धर्मतत्त्वांच्या पायावर अधिष्ठित असलेल्या प्रबल नीतिशास्त्राच्या आधारावांचून, कोणच्याही राष्ट्राला उन्नती होण्याची आशा व उमेद धरणे शक्य नाही. काही लोक नीट शास्त्रोक्त व पूर्ण विचार करीत जातात. पण त्यांची प्रमेय अन्यथा असल्यामुळे, ते अनीश्वरवादी बनतात. ज्यांना या संसाराविषयी खोल व योग्य विचार करण्याला फावत नाही, किंवा जे त्याच्या विषयी विशेष काळजी किंवा पर्वा करीत नाहीत, अशा खुशालचेंडू मंडळीच्या मनांत, या जगाच्या परमकृपाळू व दयाघन विधात्याविषयी विचारच येत नाही. बहुतेक प्रत्येकाला या संसारामध्ये केव्हां ना केव्हां, महत्संकटाचा असा एखादा प्रसंग अवश्यमेव येतोच, की, त्या वेळी त्याच्या मनाला धैर्य किंवा समाधान वाटण्याला, व पुढे आलेल्या मोहजालांत न फसण्याजोगी मनोवृत्ती होण्याला, धर्माची आवश्यकता वाटतेच.विलायतेंतील भले गृहस्थ हे भक्कम व्यवहारज्ञानसंपन्न. वाढत्या तरुण पिढीला वाडवडिलांच्या धर्माचे शिक्षण देणे, राष्ट्राचे कर्तव्य असून ती मंडळी स्वतः -त्यासंबंधी योग्य व शास्त्रोक्त विचार करण्याला समर्थ होईपर्यंत, ३१४