पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/333

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इंग्रज लोकांतील शिक्षण. "आजकालच्या उद्योगधंद्याची स्थिती व तिच्यासंबंधी उपायऔद्योगिक शांतता," या विषयावर, मिस्तर ई. एल्. एस्. हार्सबर्ग, बी. ए., क्वीन्स कॉलेज, ऑक्सफर्ड, यांनी व्याख्यान दिले होते. ___ याच संबंधांत इंग्लिश शिक्षणक्रमांतील धार्मिक विषयांच्या बाबतीत व त्याचा हिंदुस्थानांतील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांपैकी एकाशी असलेल्या संबंधाविषयी थोडेसे विवेचन करणे अवश्य आहे. इंग्लंड देश मुख्यतः जड सृष्टीच्या विचारामध्येच गर्क असतो, अशी माझी समजूत होती. पण तेथील लोकांच्या जीवनक्रमामध्ये धर्माकडून पुष्कळच महत्त्वाची कामगिरी घडत आहे, असें, प्रत्यक्ष माहिती मिळाली तिच्यावरून पाहून, मला भारी आश्चर्य वाटले. प्रत्येक. खेडे, गांव, 'पारिश, ' हरएक कॉलेज, सर्व मोठमोठ्या शाळा, वर्क हौसेस व खुद्द तुरुंग, इत्यादि सान्या ठिकाणी, विवक्षित, प्रार्थनेची मंदिरे असतात. इंग्लंडामध्ये दोन तीन शनकांपूर्वी हिंदुस्थानांतल्याप्रमाणेच वरिष्ठ प्रतीचे शिक्षण, व धार्मिक शिक्षण, ही समानार्थक पदें होती. आजकाल इंग्लंडांत इतर अनेक विषयांप्रमाणेच, धर्म हा शिक्षणक्रमापैकी एक विषय झालेला आहे. पण सर्व शिक्षणक्रमामध्ये साधारणतः धार्मिक तत्त्वे बऱ्याच अंशांनी मिसळलेली असून, त्याच्या योगाने विद्यार्थिवर्गाच्या चारित्र्यामध्ये विशेष सत्व व जोम येत आहेत. ३१३