पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/332

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. -मूव्हमेंट'ची संस्था आहे. तिच्या द्वारे या विश्वविद्यालयांना आपल्या मर्यादित क्षेत्राबाहेरही शिक्षणाचा प्रसार कर'ण्याची तजवीज करतां येते. भौतिक शास्त्र, वाङ्मय, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, आणि कामकरी मंडळीला विशेषेकरून उपयोगी अशा विषयांवर, त्यांच्यामध्ये पारंगत असलेल्या व्याख्यानकारांना, निरनिराळ्या गांवांत व शहरांत, व्याख्यानमाला देण्यासाठी पाठविले जाते. ही सर्व व्याख्याने सामान्य लोकांनाही सहज समजतील, अशी सोप्या भाषेत दिली जात असल्याने ती सर्व श्रोत्यांना समजण्याला अडचण पडत नाही. अशा तीन चार व्याख्यानांची माला ऐकण्यासाठी सरासरी साडेपांच रुपये फी पडते. या व्याख्यानमालांचे मुख्य उद्देश पुढे लिहिल्याप्रमाणे असतात. सामान्य चाणाक्ष व शोधक श्रोत्यांच्या मनाला उत्तेजन मिळावें, निरनिराळ्या विषयांचे विशेष अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्ग दाखवून मदत व्हावी, कोणच्या विषयावर कोणकोणची पुस्तके वाचावीं तें सुचवून शिक्षणक्रम आखून द्यावा, व तयार मंडळीच्या परीक्षा घ्याव्या. प्रत्येक व्याख्यान आटपल्यावर, त्यांतील विषयावर प्रवचन होते. त्याच्यांत त्या विषयाचे विशेष स्पष्टीकरण केले जाऊन विद्यार्थ्यांना न कळणाऱ्या भागासंबंधाने खुलासा करून घेता येतो. पद्धतशीर अभ्यास चालविणा-या मंडळीसाठी, दर आठवड्याला लेखी प्रश्न देऊन त्यांनी दिलेली उत्तरें तपासून दिली जातात. येथे असतांना आम्ही अशा एका व्याख्यानाला गेलो होतो. तेथे ३१२