पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/331

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इंग्रज लोकांतील शिक्षण. अँड गिल्ड्स एन्जिनियरिंग कॉलेज' व 'वेस्टमिन्स्टर स्कूल, ही मी पाहिली. यांतील पहिले 'लंडन युनिव्हर्सिटी' खाली // असून, त्याच्यांत उत्तम त-हेचे धंदेशिक्षण दिले जाते. दुसरी शाळा पूर्वीच्या 'पब्लिक स्कूल'च्या धर्तीची आहे. तेथील व्यवस्था पाहून माझ्या मनावर फार चांगला ग्रह झाला. तेथे फार खर्च येतो, असेंही नाही. शिक्षक व विद्यार्थी, यांचा परस्पर संबंध, बराच प्रौढपणाचा व आदबशीर असतो.) या शिक्षणक्रमाची शेवटची पायरी 'युनिव्हर्सिट्यां'ची. लंडन युनिव्हर्सिटीचे ऑफिस मी पाहिले. तेथील शिक्षणविषयक ध्येय फारच श्रेष्ठ असल्याचा लौकिक आहे. तेथील लायब्ररी पहिल्या प्रतीची आहे. आणि लॅबोरेटरी सर्व सामग्रीने परिपूर्ण आहे. तिच्यांत काळजाचे ठोके स्पष्ट दाखविणारे यंत्र असून तें आधुनिक वैद्यकशास्त्रसंबंधांतील एक अद्वितीय नवीन क्लुप्तीचे निदर्शक आहे.बायकांना शिक्षणक्रमांतील पदव्या देण्याच्या कामी या युनिव्हर्सिटीनेच पुढाकार घेतला, हे ध्यानात ठेवण्यासारखें आहे. आक्सफर्ड व केंब्रिज मध्ये अद्यापि बायकांना त्या पदव्या देण्याचा रिवाज नाही. परंतु स्त्रियांनी पुरुषांबरोबरच, सर्व शिक्षणक्रम पुरा करून घेण्याची सर्व साधने व सोई करून ठेवलेल्या आहेत. ठराविक शिक्षणाच्या सोईशिवाय, या विश्वविद्यालयांना उपयोगी व पुरवणीदाखल अशी 'युनिव्हर्सिटी एक्स्टेन्शन ३११