पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/330

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. धंदा किंवा नोकरी, यांच्या मागे लागलेल्या तरुण मुलांमुलींना शिक्षणक्रम पुढे चालवितां येतो. त्यांना नोकरीत ठेवणाऱ्या बऱ्याचशा लोकांकडून, नोकरीचा कांहीं वेळ या कामी खर्च करण्याला परवानगी वगैरे देऊन, उत्तेजन दिले जाते.हरहुन्नरशिक्षणाच्या बहुतेक मोठ्या गांवांतून विशिष्टधंदेशिक्षणाच्या व 'पॉलिटेक्निक्स' शाळा असतात. तेथे कामकरी मंडळीला हातकसबाचें काम, इमारत काम, व्यापार व व्यवहार, भाषाज्ञान,आणि प्रत्येकाच्या निरनिराळ्या धंद्यासंबंधी शास्त्रीय विषय आणि कला, इत्यादिकांचे ज्ञान मिळविण्याची साधने उपलब्ध असतात. या सर्वांमुळे, कामकरी लोकांची बरीच सुधारणा झाली आहे, इतकेंच नव्हे,तर त्यांच्या अंगी जास्त चतुराईनें काम करण्याची योग्यता आल्यामुळे प्रत्येक कारखान्यांतील माल पूर्वीपेक्षा अधिक चांगला तयार होत आहे आणि त्या योगाने देशाचाही फायदा झाला आहे. विलायतच्या लोकांसाठी इतक्या त-हेच्या सोई सुलभ असल्यामुळे त्यांच्याशी आमच्या हिंदुस्थानांतील अत्युत्तम कारागिरांना सुद्धां, सामना करून यश मिळविणे अशक्य झाले आहे. इंग्लंडांतील दरिद्री माणसाला सुद्धां, अव्वल प्रतीचे शिक्षण मिळवून घेण्याची उमेद बाळगण्याला जागा आहे. पण हिंदुस्थानांत तें शिक्षण केवळ सुखवस्तू लोकांसाठीच राखून ठेवल्यासारखे झालेले आहे. सरकारी शाळा व शिक्षणसंस्था, यांशिवाय, खासगी शाळा व कालेजेंही पुष्कळच आहेत. त्यांपैकी 'सिटी ३१०