पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/329

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इंग्रज लोकांतील शिक्षण. । अगदी लहान मुलांच्या शाळेत ' किंडरगार्टन '-बालोद्यानपद्धती-चें शिक्षण फायदेशीर व लोकप्रिय होते.या बालोद्यानशिक्षणपद्धतीचा मुख्य हेतू हा आहे की, व्यवस्थित खेळकरमणुकी व मनोरंजक वस्तुपाठ, इत्यादिकांच्या द्वारें, मुलांच्या चौकसपणाचा सहज व क्रमाक्रमाने विकास होत जावा आणि त्यांच्या मानसिक व नैतिक वृत्ती व शारीरिक शक्ति यांची वाढ, सरळ व परस्परांना अनुकूल अशा रीतीने होत जावी. सार्वजनिक प्राथमिक शाळांमधून, चौदा वर्षांपर्यंतच्या मुलांना एकंदरीत सामान्य त-हेचे शिक्षण चांगलेच दिलें जाते. त्यांच्यांतील साधनसामग्री, हिंदुस्थानांतील प्रमुख शाळा व कालेजें, यांनासुद्धां शोभेल अशी असते. शिवाय त्या शाळांतून वरिष्ठ प्रतीच्या शाळांत व तेथून 'यूनिव्हर्सिटी' मध्ये जाण्याला होतकरू विद्यार्थ्यांना मदत व्हावी या हेतूनें व्यवस्थित स्कॉलरशिपांची योजना करण्यांत आलेली असते. अभ्यासक्रम पुढे चालविण्याच्या सायंकाळच्या शाळा, या शिक्षणक्रमाच्या पद्धतीतील पुढची पायरी होत. तेथे जाणे न जाणे, ज्याच्या त्याच्या मर्जीवर असते. नांवाला थोडीशी फी भरून, त्यांच्यांत, हिशेब, चित्रकला, व्यापारी व रोजच्या व्यवहारांतील पत्रे लिहिण्याच्या पद्धती, लघुलेखन, लांकडावरील कोरीव काम, आधुनिक भाषा, शिंप्याचे काम, सूपकर्म, वगैरेचे शिक्षण मिळते. त्यामुळे,शाळा सोडून, उद्योग ३०९