पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. लागली. टेकड्यांच्या उतारावर भरदार, दाट व हिरव्याचार झाडीचे सौंदर्य पाहून मला चमत्कार वाटला. मोठमोठे खडकांचे सुळके खेरीज करून सारी जमीन लागण केलेली दिसली. अशा या सुंदर व हरितवर्ण वनश्रीचे दर्शन मनाला स्फुर्तिदायक होते. आमच्या प्राच्य दिग्भागांतून मी इकडे अनुपम सृष्टिसौंदर्य दृष्टीस पडेल या उमेदीने आलो होतो. माझ्या पाहण्यांत आलेला सर्वच भाग या कल्पनेपेक्षा किती तरी अधिक सुंदर व प्रेक्षणीय होता. सार्डिनिया, कॉर्सिका व एल्बा नेपोलियनच्या हद्दपारीची जागा-हीं सुप्रसिद्ध बेटे ओलांडल्यावर 'स्ट्रांबोली' ज्वालामुखी पर्वत दृष्टीस पडला. तो जोरांत असून त्याच्यांतून चोहीकडून धूर निघत होता. तरी पहाडाच्या उतारावर लागवड झालेली होती, ती व लगतच घरेही दिसत होती. जरी ती आम्हांला बरीच धोक्यांत आहेत असे वाटले, तरी त्यावरून तेथील शेतकरी लोकांना तरी भय म्हणजे काय याची क्षिती नव्हती. हे अगदी स्पष्ट दिसण्यासारखे आहे. तेथून निघाल्यावर आम्ही सुखांत आणि त्रास न होतां 'मार्सेलिस'ला जाऊन पोहोंचलों..