पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/328

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. मधील नवीन शोध लावण्याच्या बाबतींत फ्रान्स व अमेरिका यांना प्रमुखपणा मिळत आहे; तो तरी याच कारणांमुळे. तसेंच इंग्लंडाने व्यापारसंबंधांत जो अद्वितीय वरिष्ठपणा मिळविला आहे, त्याचा खरा व पक्का आधार, होतकरू पिढीच्या मानसिक तयारीच्या पुर्तेपणावरच सर्वथैव अवलंबून आहे; ही गोष्ट इंग्लंडाला पुर्तेपणी समजून गेलेली आहे. ग्रेट ब्रिटन् मधील तरुण मंडळीला शिक्षण देऊन तयार करण्यामध्ये, सरकार जी जणों पितृवात्सल्याने व कळकळीने, काळजी घेत आहे, ती माझ्या ध्यानात आल्यावांचून राहिली नाही. विलायतेंतील प्राथमिक शिक्षण फुकट व सक्तीचे असून, शिवाय पुष्कळ ठिकाणी अगदी गरीबांच्या मुलांना, शाळेत न जाण्याला सबब राहूं नये म्हणून, खाणे पिणे व बूट फुकट देतात. याचें सारें श्रेय तिकडील लोकसमाजाच्या औदार्याला आहे. मुलांना तरी शाळेत आर्जव करून पाठवावे लागते, असे नाही. पूर्वीच लिहिल्याप्रमाणे, निरनिराळ्या गांवांतील प्राथमिक शाळा, मी जाऊन पाहिल्या त्यांतील मुलें एकंदरीत आपले धडे आनंदाने तयार करीत असल्याचे व शिकविलेले पाठ कुशाग्र बुद्धीने ग्रहण करीत असल्याचे माझ्या निदर्शनास आले. साधारणतः सामान्यशिक्षणपद्धतीचा मुख्य अभ्यासक्रम ' बोर्ड ऑफ एज्युकेशन ' ठरवून देते. पण शिक्षण देण्याच्या त-हेमध्ये बराच फरक असतो. ३०८