पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/327

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग बावीसावा. इंग्रज लोकांतील शिक्षण. 'सामान्य मनाला वळण लावून तयार करणारे असें शिक्षणच. खांदी वळवावी तसेंच झाड तयार होते. . पोप. ए लॉर्ड रोजबरी, हे इंग्लंडांतील प्रमुख वक्त्यांपैकी शिरोरत्न होत. त्यांनी थोड्या दिवसांखाली झटले आहे की, 'युरोपांतील मोठमोठ्या राष्ट्रांमधील भावी प्रचंड कलह, मेंदूच्या शक्तीच्या द्वारे होईल, रक्तपाताचा नव्हे. तो कलह व तदानुषंगिक युद्धे, व्यापारसंबंधाने होतील, आणि प्रत्यक्षतः व्यवहारोपयोगी शिक्षण, हेच त्याचे नियामक तत्त्व होईल.' हे त्यांचे म्हणणे, जसे एखाद्या महात्म्याच्या भविष्यवादाप्रमाणे खरे ठरले. हा कलह तूर्त चालूच आहे. जर्मनीने बरोबरीच्या प्रतिस्पर्धी मंडळीपेक्षा, पुष्कळचशा बाबतीत किती तरी पढें धांव मारली आहे. तिने पुष्कळ वर्षांपासून आपल्या प्रचंड लोकसमाजामध्ये शिक्षणाच्या प्रसारासाठी ज्या अटोकाट सोई करून ठेविल्या, त्यांचेच हे फळ होय. भौतिक शास्त्रा ३०७