पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/326

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. वाईट नाहीत, असे शोधनाअंती दिसून आले. प्रत्येकीमधील चांगुलपणा शोधून काढणे, हीच मुख्य व महत्त्वाची गोष्ट होय. आपणाला त्यांच्याकडे मानवी हिताहिताच्या दृष्टीने पाहून, त्यांची टवाळी करण्याऐवजी, सुधारणा करण्याच्या दृष्टीने लक्ष दिले पाहिजे. असल्या व इतर मानवबंधूंच्या न्यायदृष्टीसंबंधांत आपल्या मनाची दृष्टी अधिकाधिक उदारपणाची होण्याविषयीं, यत्न करीत राहिले पाहिजे, आणि आपण, _'दोषाविषयीं आंधळे, क्षमा करण्याला तत्पर, परार्थ प्राण धारण करणारे, व स्वतःप्रमाणेच इतरांनाही जिवंत राहूं देण्याला तयार, असे झाले पाहिजे.' या मार्गानेच आपल्या जीवनक्रमावर सुख व संपदारूपी हिरण्मय सूर्यप्रभा फांकेल. महासागरावर फिरणारी अनेक गलबतें, निरनिराळा मार्ग क्रमोंत असली तरी, ती शेवटी, एकाच बंदराला पोहोचू शकतात. तद्वत्, या जीवयात्रेची स्थिती आहे. सुंदर चेहऱ्यावरील प्रत्येक स्मित, तसेंच प्रत्येक पुष्प, जतन करण्यायोग्य आहे. पण ते कसे करावयाचे हे जाणले पाहिजे. प्रत्येक जीवनचरित्रामध्ये जगताला देण्यायोग्य असा काही तरी भाग अवश्य असतो. ३०६