पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/325

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्राच्य व पाश्चिमात्य चालीरीती. काधिक आवड लागत आहे. सुखवस्तू व संपन्न लोकांचा जीवनक्रम जास्त ऐषआरामाचा होतो आहे, असें सकृद्दर्शनी चाटते पण सामान्यतः सर्वसाधारण लोकांच्याच जीवनचर्येचें मान वरिष्ठ प्रतीचे होत आहे, असे मला खात्रीपूर्वक कळविण्यांत आले. हे सुदैवाने खरेंच ठरले तर, पाश्चिमात्य सुधारणेची भावी स्थिति खचित आशाजनक आहे. अभिनवयौवनावस्था ही सर्वत्र उच्छृखळपणाचे जसें वारूळ. प्रौढावस्थेमध्ये सुखोपभोग अधिक भारदस्तपणाचे होतात. वयोमानाप्रमाणे मनुष्याच्या अंगी अधिकाधिक नेमस्तपणा येतो. मन हळू हळू न कळत वरिष्ठ कोटीच्या मार्गाकडे व उद्योगाकडे, तसेंच नित्य च अनश्वर, सत्य व अनंत, वस्तूच्या चिंतनाकडे, आणि भविष्यत् चिरकालिक व अज्ञात स्थितीकडे वळू लागते. ही भावी अज्ञात स्थितीच साऱ्या जगाला मोठ्या आशेचा विषय होऊन राहिली आहे. जी गोष्ट व्यक्तींना तीच राष्ट्रांनाही लागू पडते. अपरिचित चालीरीतीसंबंधाने कोणीही ठासून विधान करणे एकंदरीत योग्य नव्हे. इंग्लंडाला येण्यापूर्वी व आलो तेव्हाही, पाश्चिमात्यांच्या चालीरीतींसंबंधाने माझा काहीसा प्रतिकूळ ग्रह होता, हे मी कबूल करितो. पण यापूर्वी निदर्शन केल्याप्रमाणे, त्यांच्यापैकी प्रत्येकीचा काही ना काही उपयोग आहे. यांपैकी काही चालीरीती मला पूर्वी वाटत होत्या तितक्या त्या ३०५