पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/324

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. राम व जानकी, किंवा नल व दमयंती, यांची चरित्रे ही याची उदाहरणे आहेत. त्यावेळी तेथील सहस्रावधि उत्तमोत्तम, नरनारीरत्नांविषयी अभिमान बाळगण्याला, त्या देशाला जागा होती. देशांत अशी नरनारीरत्ने असणे हे कोणत्याही देशाला अभिमानास्पद होय. तेथील स्त्रियांमध्ये पतिव्रत धर्माची जाणीव अद्यापिसुद्धा उत्कट व जागरूक आहे. पाश्चिमात्य शिक्षणा-- च्या द्वारे तेथील युवकांच्या अंतःकरणांत 'शिव्हलरी' ची कल्पना रुजत चालली आहे. ही दोन्ही ध्येय साध्य करण्यामध्ये, त्याच्या साधनांचा अतिरेक न होऊ देण्याची खबरदारी घेतली गेली तर, आमच्या मातृभूमीलाही लौकरच हटकून उज्ज्वल स्थिती प्राप्त होईल, अशी माझी खात्री आहे. - इंग्लिश लोकांची राहणी निर्मळ व व्यवस्थेशीर असते. ते. नियमित वेळी खानपान करितात. यामुळे गृहकृत्यांचा उरक सोपा जातो. ते सामान्यतः कामाकाजाच्या वेळी खूप मेहनतीने काम करितात, व फुरसतीच्या वेळी खेळांत मनापासून गढून जाऊन खेळतात संवरतात. आजकाल इंग्लंडांत मद्याचा. खप कमी होत चालला आहे, असे मला सांगण्यांत आले. या गोष्टीचे मला खरोखर समाधान वाटलें. त्याच्यापासून गुन्हेही कमी घडू लागले आहेत, तसेंच समाजाचे आरोग्य व नैतिक प्रवृत्ति, यांचाही जोम वाढतो आहे. मद्यपान खालावत चालल्याबरोबरच, उच्च प्रतीचे करमणुकीचे मार्ग व बुद्धिविषयक सुखसाधने यांची लोकांना अधि ३०४