पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/323

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्राच्य व पाश्चिमात्य चालीरीती. मध्ययुगीन नवीन 'शिव्हली'सारख्या संस्थेची आवश्यकता नव्हती. तसेंच, आपला राजा, वडीलधारे, गुरू, आणि सर्वच स्त्रिया,यांच्या संबंधांत आपली कर्तव्ये काय आहेत,याची बाहेरून जाणीव होण्याची, त्यांच्यामध्ये केव्हांच उणीव नव्हती. शिव्हलरी' शब्दाचा अतिशय व्यापक अर्थाचा भाव, हिंदी लोकांच्या अंतःकरणामध्ये, त्यांच्या हातून जगांतील अतिश्रेष्ठ व थोर कृत्यांपैकींच पुष्कळशी कृत्ये घडत असतांना, जोराने उचंबळत होता. झीज सोसण्याची शक्ती व ती ज्यांच्या प्रीत्यर्थ सोसावयाची, ते गुरुजन, दीन दुबळे, गरजू, व रंजले गांजलेले लोक, यांच्याकडे खास लक्ष पुरविणे, या गोष्टींमध्ये हिंदुस्थान देश इतर कोणत्याही देशाला आहारी जाण्याजोगा नव्हता. हे 'ध्येय, तदनुरूप वर्तन व प्रयत्न चालू होते तोवर, त्या देशाचा मोठा उत्कर्ष होता. त्याच्यापासून चळल्यानंतरच त्याचा भराभर हास होऊ लागला. 'शिव्हलरी ' आणि 'पतिव्रत,' या दोन्ही ध्येयांचे आजकाल एकीकरण हवे आहे. पौर्वात्यांनी पाश्चिमात्यांकडून हल्लींच्या अर्थाची 'शिव्हलरी' शिकली पाहिजे. तसेच त्यांनाही पाश्चिमात्यांना त्याच तोडीचा धडा देतां येण्याजोगा आहे. या दोहोंचे योग्य सम्मीलन झाले होते,अशा एका काळी हिंदुस्थान देश सुखी व भाग्यवान् होता. त्या दिवसांत पुरुष व स्त्रिया आपापल्या क्षेत्रांत परस्परांना श्रेष्ठ व पूज्य समजून वागत असत. ३०३