पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/322

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. तो अर्थ व गुणसमुच्चय अगदी 'शिव्हली'च्याच मासल्याचा होता. त्याचाही मूळचा अर्थ अधिक व्यापक होता. त्याचाच पुढे कौटुंबिक कर्तव्यांपैकी एका विशिष्ट गुणापुरता हल्लीच्या अर्थाच्या पातिव्रत्याचा द्योतक-अर्थ कायम झाला. 'शिव्हली' मुळे शूरवीराला आपल्या प्रणयपात्राला खुष करण्यासाठी किंवा तिच्या केवळ मर्जीखातर, हवी ती घस सोसण्याला तयार व्हावे लागे. त्याप्रमाणे इकडे हिंदी पतिव्रतेने स्वतःचे हित व सुख, यांच्यापूर्वी पतीचे हित व सुख साधण्याला झटणे स्वतःचे कर्तव्य समजून, पतीची प्रत्येक आज्ञा शिरसा मान्य करून तदनुरूप स्वतःचे वर्तन ठेवणे आवश्यक आहे, असे समजले जात असे. पाश्चिमात्य देशांत 'शिव्हलरी 'साठी, स्त्रियांना सर्व त-हेनें मान देणे, व त्यांची श्रेष्ठता कबूल करणे हक्काचे समजले जाऊ लागले. तसेंच पूर्वेकडील देशांत 'पतिव्रत' धर्माअन्वयें पुरुषाकडे सर्व मान व वरिष्ठपणाचा हक्क आला. 'शिव्हली'च्या द्वारें, स्त्री मणजे मूर्तिमान सद्गुणाची पुतळी बनली, व पुरुषांनी तिला मान देण्याची व त्यांच्या हातून संरक्षण केले जाण्याची तिच्या अंगी पात्रता आली. तद्वतच पतिव्रताच्या द्वारे स्त्रीला पुरुषाच्या श्रेष्ठतेची जाणीव झाली, व तिच्यापासून ताबेदारी व मान मिळविण्याचा त्याला हक्क प्राप्त झाला. गरीब व रंजले गांजलेल्या लोकांच्या संरक्षणाविषयीं, हिंदी लोकांच्या मनांत सहानुभूती उत्पन्न करण्यासाठी, युरोपांतील ३०२