पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/321

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्राच्य व पाश्चिमात्य चालीरीती. अशा अर्थाने ' शिव्हली ' शब्दाचा उपयोग करीत असत. पुढे त्याच्या सर्वमान्य अर्थात सद्गुणसंपन्न वीराच्या अंगचा एकच विशिष्ट गुण समाविष्ट होऊ लागला. सामान्यतः स्त्रीजातीसंबंधी, व त्यांतही आपल्या प्रणयपात्र स्त्रीसंबंधी, एका विशेष कर्तव्याच्या जबाबदारीचे त्याच्यापासून निदर्शन होऊ लागले. मूळारंभापासून या ' शिव्हली ' रूपी संस्थेमुळे जें उपयुक्त कार्य घडले, आणि पाश्चिमात्य सुधारणेवर तिचे जे महदुपकार झाले, त्याचे दिद्गर्शन करणे वावगे होणार नाही. कारण त्यामुळे त्या काळच्या दणगट, असंस्कृत तथापि उदार व सत्यनिष्ठ लोकांच्या मनांत गरीब व निराश्रित लोक विशेषेकरून स्त्रिया यांच्या हक्कांची जाणीव उत्पन्न होऊन, त्यांच्यासाठी आपण काय व कशी घस सोसणें अवश्य आहे त्याची त्यांना पुरी उमज पडण्याला एक साधन मिळाले. दिवसगतीने या 'शिव्हलरी'च्या ध्येयामध्ये बदल होऊन त्याला संकचितपणा आला, तरी गरजू व जुलूम झालेल्या व्यक्तींच्या संरक्षणासाठी या शूरवीरांच्या प्रबळ बाहूंना आपलें शौर्यबल दाखविण्याचे वेळोवेळी प्रसंग पडत, आणि याप्रमाणे, त्या काळी समाजाकडून मिळणे अवश्य असणारे स्त्रियांच्या संरक्षणाचे साधन, 'शिव्हलरी'नें प्राप्त करून दिले. हिंदू स्त्रियांच्या दृष्टीने ' पतिव्रत' शब्दाचा जो अर्थ होता व त्या शब्दांत ज्या सद्गुणांचा समावेश केला जात असे ३०१