पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/320

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. ल्याशिवाय-निदान तसे करणाऱ्या हिंदी स्त्रिया मोकळेपणी बाहेर पडलेल्या पाहून, त्यांची टवाळी व थट्टा करण्याचे सोडल्यावांचून, हिंदी स्त्रिया ती तन्हा सोडणार नाहीत, असे इंग्लंडांत सकुटुंब रहात असलेल्या एका हिंदी सद्गृहस्थांनी मला सांगितले. तें कांही असो; हल्ली या बाबतींत फेरबदल होतो आहे. काही झाले तरी एका जातीच्या किंवा वर्गाच्या स्त्रियांना इतरांच्यापेक्षां प्रागतिक होण्यांत 'फाय ब्रांड्स'-आगलाव्याअशाप्रकारची अपमानकारक विशेषणे सोसून घ्यावी लागणारच. कांहीं घस सोसलीच पाहिजे व अडचणी भोगल्या पाहिजेत. साऱ्याच प्रगति आणि सुधारणांसाठी अशा प्रकारची प्रायश्चित्तें भोगणें प्राप्त पडतेच. मी स्वतः या बाबतींत, इंग्रज लोकांइतपत पुढे पाऊल टाकण्याला तयार नाही. तरी काही फेरफार हवा आहे, आणि आजवर समाजसुधारणेच्या बाबतींत आमचे पुढे पडलेले पाऊल बरेंच आशाजनक आहे. पुढे पुढे 'शिव्हली ' शब्दाचा जो विवक्षित अर्थ मानण्यांत येऊ लागला, त्यामध्येच युरोपियन समाजामध्ये स्त्रियांविषयीं जो आदर दाखविला जातो, व त्यांना जो अग्रेसरपणा दिला जातो, त्याचे मूळ पाहिले पाहिजे. पूर्वी पूर्वी या शब्दामध्ये शूरवीराच्या अंगच्या सर्व श्रेष्ठ गुणांचा व शोर्याचा समावेश होत होता. दुर्बल व गांजलेल्या व्यक्तिमात्रांचे संरक्षण करणे, व त्यांच्यासाठी खस्त खाणे, वीरपुरुषाचे कर्तव्य आहे ३००