पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/319

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्राच्य व पाश्चिमात्य चालीरीती. हिंदुस्थानांतील स्त्रियांच्या स्थितीशी ताडून पाहतां, या गोष्टी किती तरी विरुद्धशा आहेत. तिकडे थोड्याच वर्षांपूर्वी त्यांना कोठे बाहेर पाठविणे अवश्यच आले तर, त्यांच्या योग्य संरक्षणाची तजवीज करणे भाग पडत असे. कारण,त्यांना कोणी त्रास देऊ लागला तर,कोणाकडून मदत किंवा सहानुभूती मिळण्याची खात्री नसे. तिकडेही स्त्रियांना मोकळेपणी बाहेर जातां फिरतां न येण्याला एक सुद्धां योग्य व सबळ कारण आढळत नाही. पण याविषयीची हल्ली असलेली समजूत बदलण्यापूर्वी तिकडील लोकांच्या मनांत इंग्रजी त-हेच्या 'शिव्हली'-स्त्रीविषयक आदरबुद्धी-ची जाणीव उत्पन्न झाली पाहिजे. तिकडील स्त्रियांमध्ये स्वावलंबन व स्वतःवरील जबाबदारी यांविषयींची जास्त जाणीव आल्याशिवाय, हिंदुस्थानांतील सांपत्तिक व कौटुंबिक स्थिती सुधारणे शक्य नाही. वास्तविकपणे सर्वतोपरी परावलंबी व दुसऱ्यांनी काळजी घेण्याच्या स्थितीत राहण्या'ऐवजी, हिंदी स्त्रियांनी स्वत:च्या कुटुंबांतील माणसांनी अंगावर घेतलेल्या हरएक कामांमध्ये साहाय्य करता येईल, इतकी योग्यता संपादन केली पाहिजे. स्त्रियांना पडद्यांत ठेवण्याचा प्रघात मुसलमानांपासून अनुकरण केलेला आहे, अशी समजूत सर्वमान्य झालेली आहे. रहदी स्त्रियांच्या प्रगतीला, मुसलमान लोकांची आपल्याला जबरदस्त आडकाठी आहे, कारण त्यांच्या स्त्रियांनीही पडदा सोड २९९