पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

समुद्रातील सफर. या मजेदार सफरीमध्ये मनावर झालेल्या या संस्कारामुळेच, आजकालच्या एखाद्या ब्रिटिश लायनरनें--वास्तविक तरत्या महालानें सफर करणे ह्मणजे एक प्रत्यक्षतः शिक्षण होय, असे मला निश्चयाने वाटले. असल्या आगबोटी आतां बहुतेक प्रत्येक समुद्रावर फिरतांना आढळतात. त्या साऱ्या भूगोलाला अक्षरशः प्रदक्षिणा घालीत येरझारा करीत असतात. अशाच त-हेचा हा विचार मनात येऊन प्रत्येक हिंदी गृहस्थाला, आपणही, प्राचीन रोमन साम्राज्यापेक्षां पुष्कळच प्रचंड व विस्तृत, बहुतेक सर्वव्यापी, अशा साम्राज्याचे एक अंशतः घटकावयव आहो, याबद्दल अभिमान बाळगतां येण्याजोगा आहे. मेसेनाच्या सामुद्रधुनींतून जातांना सिसिली बेटाच्या किनाऱ्यावर बार्सिलोना व इटालीच्या बाजूला रोजियो ही शहरें आहेत. व युरोपांतील भूमीचे प्रत्यक्ष असें दर्शन येथेच घडले. पहाटेस आह्मी मेसेनाला पोहोंचलों, व लगेच आगबोटीच्या डेकवर गेलो. त्यावेळी फक्त किनाऱ्यावरील कंदिलांच्या रांगांखेरीज काही दिसले नाही. इतके दिवे पाहून मला आश्चर्य वाटले. आम्ही जणों मुंबईसारख्या एखाद्या मोठ्या शहराजवळच जात आहों असा भास झाला. उजाडले तसे आम्हांला दोन्ही बाजूला इटालीचे आणि सिसिलीचे हिरवे गर्द किनारे व त्यांवरील आगगाडीच्या सडका, व मधूनमधून घरे असलेली शेते आणि तेथील जागृति व हालचाली इत्यादि सर्व प्रकारची चिन्हें दिसू