पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/318

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. जपानी शिपायापाशी 'फिल्टर'-पाणी गाळण्याचे लहानसें | यंत्र-असें प्रत्येकाला दहा पंधरा शेर पाणी ठरावाप्रमाणे मिळत असे. यामुळे त्यांना रोगराई झाली नाही. त्या युद्धांमध्ये त्यांनी जो काटकपणा व सोशिकपणा दाखविला, तो बहुतेक याचाच परिणाम होता, असे मानतां येण्याजोगे आहे. स्त्रियांशी वागणूक ठेवण्या संबंधांत प्राच्य व पाश्चिमात्य याच्यामध्ये पुष्कळच फरक आहे. स्त्री जातीविषयी आदर, युरोपच्या पश्चिम भागांत बहुतेक सार्वत्रिक आहे. 'प्रथम स्त्रिया' ही ह्मण तिकडे सर्वत्र प्रचारांत आहे. युरोपियन बाय - कांना मोकळेपणी स्वातंत्र्य उपभोगितां येतें, व वाटेल तसें बाहेर राहतां फिरतां येते. हा सर्व तिकडील पुरुषांच्या मनांत सदैव जागरूक असलेला स्त्री जातिविषयक शिव्हली - आदरभाव-चाच परिणाम होय. इंग्लंडमध्ये तर स्त्रिया पुरुषांइतक्याच स्वतंत्र आहेत. त्यांच्यावर कोणच्याही त-हेचा दाब नाही. त्यांना कोठेही आडकाठी नाही. एखाद्या स्त्रीला बाहेर एकटें फिरतां सवरतां किंवा प्रवासाला जाता येते. तिला त्रास किंवा अडचण येण्याची भीति मुळीच नसते. बाहेर समाजामध्ये असतांना, तिला मज्जाव करण्याची, किंवा कसलीही अडचण आणण्याची, कोणाचीही प्राज्ञा नाही. तिचा उपमर्द करणे तर एकीकडेच राहिले, पण तिच्याशी यत्किंचितही आगळिकीचे वर्तन झालेले कोणाच्याही दृष्टीस पडले तर, त्याला तात्काळ बलवत्तर त्वेष आल्याशिवाय रहात नाही. २९८