पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/317

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. वाटेंतील एका मुकामा सारखाच जणों आहे-खरोखर 'एखाद्याला अगदीच अवश्य अशा वस्तू किती थोड्या असतात स्याचे निदर्शन होतें. इंग्रज लोक फ्याशन्च्या चंचलपणाचे इतके निस्सीम बंदे गुलाम असूनही, ते आपल्या रीतीरिवाजासंबंधांत पक्के कान्सरव्हेटिव्ह-चालत आलेल्या पद्धतीला धरून राहणारेआहेत. लोकांच्या डोळ्यांत येण्याजोग्या किंवा हंसे होण्यासारख्या गोष्टी करण्यांत ते फार मागे पुढे पाहतात. तरी एखादी नवी तन्हा एकदां कां सुरू झाली, की ती तेव्हांच जशा सर्वमान्य होते, आणि मग पुष्कळांना जुन्या गोष्टींना चिकटून राहून, आपण चालू काळाच्या मागे पडलो आहों, अशी नांवे ठेवून घेण्याचे धैर्य राहात नाही. हिंदुस्थानांतल्याप्रमाणे स्थित्यंतर झालेल्या ठिकाणी त्या स्थित्यंतराला अनुरूप असा फेरबदल करण्यामध्ये, ते नाराजी दाखवितात. यावरून परंपरागत स्थितीला चिकटून राहण्याचा हा त्यांचा अंगस्वभाव स्पष्ट दिसून येतो. या बाबतीत इंग्रज लोक व डच लोक यांच्या मध्ये फरक दिसून येतो. जावा बेटांतील स्थित्यंतरानुरूप बऱ्याच अंशाने वागण्याला तयार होऊन, डच लोकांनी, पोषाखामध्येच नव्हे, पण खानपानादिकांतील किरकोळ बाबतीत सुद्धां, प्राच्य रीतीरिवाज पत्करिले आहेत. कारण, तेच त्या उष्ण कटिबंधांतील भागांत,जास्त सोइस्कर व हितकर प्राच्य व पाश्चिमात्य चालीरीती. होतात. इंग्रज लोकांनी या संबंधांत डच लोकांचे अनुकरण करावें. ह्मणजे त्यांना, हिंदुस्थानांत राहणें सामान्यतः जितकें दुस्सह व वाईट वाटते, तितकें तें नाहीं, असें दिसून येईल. खानपानविषयक वर्णन करितांना, प्राच्य आणि पाश्चिमात्य लोकांच्या राहणीमधील आणखी एका फरकाचे मला स्मरण झाल्याशिवाय राहात नाही. तेंही, जीवनाला अत्यंत आवश्यक अशा पाण्याच्या उपयोगासंबंधांत. इकडच्या पेक्षा प्राच्य देशांत, त्याचा पुष्कळच अधिक उपयोग होतो. भोजनापूर्वी व नंतर, पाण्याने तोंड धुण्याची तिकडे सर्वत्रिक चाल आहे. नित्य निदान एकदा तरी पाण्याचा स्नानासाठी उपयोग होतो. बरेच लोक अधिक वेळांही स्नान करितात. इंग्रज लोकाप्रमाणे हिंदी लोक पाणी भरलेल्या मोठ्याशा पिपांत बसून स्नान करीत नाहीत. तें ताजे पाणी अंगावर ओतून घेतात. ही तन्हा अधिक स्वच्छपणाची आहे. जावा बेटांतील हॉटेलामध्ये डच लोक या दोन्ही त-हांचे मिश्रण करितात. हिवाळ्यांत ऊन पाणी असले तर बरें, नाही तर 'बांभ ' मध्ये किंवा पिपामध्ये बसलेलेच चांगले, हे लक्षात ठविले पाहिजे. अंगावर पाणी ओतून घेऊन स्नान केल्याने जास्त हलकेपणा वाटतो. पुष्कळसे पाणी पिण्यांत आल्याने आरोग्यरक्षण चांगले होते, हे इंग्रज लोकांच्या नीट ध्यानी आलेले नाही. जपान व रशिया यांच्या मधील घोरं युद्धांत २९७ २९६