पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/316

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्राच्य व पाश्चिमात्य चालीरीती. पडून नगरांत पोहोचले. तेथे त्यांच्या पुढे दुःख व त्रास अवचित दत्त ह्मणून उभे ठाकले. प्रथमच एक वृद्ध मनुष्य त्यांच्या दृष्टीस पडला. त्याला, सर्व माणसें अशीच वृद्ध होतात काय, ह्मणून त्यांनी विचारिलें. तेव्हां, त्यानें, 'होय' असे उत्तर दिले. त्यावरून हे जीवन सतत कायम राहणारे यौवन नव्हे, हे गौतम बुद्धांना कळून आले. नंतर एक रोगग्रस्त मनुष्य त्यांच्या पाहण्यांत आला. त्यावरून, ' सर्व लोकांना रोगापासून पीडा होते,' हे त्यांना कळले. पुढे त्यांच्या नजरेस एक प्रेत पडले. तेव्हां, सर्वांमागे मरण हे लागलेच आहे, याचे त्यांना ज्ञान झाले. जीवन नश्वर आहे, केवळ संपत्तीच्या द्वारे सुख, तसेच दुःख व त्रास यांच्या पासून मुक्तता प्राप्त होत नाही, हे त्यांना कळून आले. त्यानंतर त्यांनी एकांत व अरण्यवास पतकरण्याचा निश्चय केला, आणि भार्या व घरदार यांच्यापासून प्राप्त होणाऱ्या सुखसमाधानाचा त्यांनी त्याग केला. रथ आणि घोडे सोडून त्यांनी अरण्याचा मार्ग धरिला. ते पायींच अरण्यभूमीच्या प्रांतभागी पोहोचले. तेथून बरोबरच्या सेवकाला त्यांनी निरोप दिला. जवळ फक्त पाणी पिण्याचा पेला ठेविला. ते एका पुष्करिणीजवळ पोहोंचले. तेथे एकजणः ओंजळीने पाणी पीत असलेला पाहून, जवळ पेला ठेवणे सुद्धा अवश्य नाही, असे त्यांना दिसून आले. याचे तात्पर्य उघड आहे. त्याच्यावरून या पृथ्वीवरील जीवनक्रमांत, जो. त्याच्या पलीकडे भावी स्वर्गीय जीवनक्रमाला पोहोचण्याच्या. २९५