पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/315

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. या आवडत्या अनुकरणाच्या इच्छेनुरूप वागून, कसल्या तरी नवीन टूमीमध्ये खर्च करण्याला अडचण पडत नाही. सारेच युरोपियन लोक, त्यांतही इंग्लिश भाषा बोलणारे, यांना फेरबदलाची भारी हौस. यामुळे त्यांच्यांत बहुतेक नेहमीच फाजील व गांवढळ डामडौलाचे प्रकार घडून येतात. अतोनात खर्च करून 'फ्रीक डिनर्स'--विचित्र मेजवान्या–व इतर तसलेच उधळपट्टीचे वेडे वेडे चार, हे याचेच मासले होत. या विचित्र प्रकारांची अमेरिकेतल्या सारख्या नवकोट नारायण मंडळीमध्ये, जशी मधून मधून सांथच उद्भवते. ___ आधुनिक सुधारणेबरोबरच पैदा झालेल्या सामाजिक प्रगतीचे अभिनंदन करितांना सुद्धां, अलीकडे दृष्टोत्पत्तीस येणाऱ्या फाजील ऐषआरामाकडील प्रवृत्तीचा कल पाहून, मन साशंक झाल्याशिवाय राहात नाही. या ऐषआरामांची अनुपयुक्तता, गौतमबुद्ध यांच्या पूर्व वयांतील चटकदार चरित्रावरून विशेष व्यक्त होते. ते एका राजाचे एकुलते एक पुत्र. ते पुढे संन्यासी होणार, असे भविष्य वर्तविले गेले होते. त्यावरून त्यांच्या कोणच्याही प्रकारची दुःखकारक वस्तू दृष्टीस सुद्धां पडूं नये, याविषयी त्यांच्या पित्याने फारच काळजी घेतली होती. त्याने त्यांच्या सभोवार जगांतील उत्तमोत्तम वस्तूंचा जणों कोट बांधून टाकला. हे राजपुत्र तारुण्यदशोला प्राप्त झाल्यावर, एके दिवशी ते कसे तरी राजवाड्याबाहेर २९४