पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/314

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्राच्य व पाश्चिमात्य चालीरीती. फ्याशन् झणजे शुद्ध ' टायरंट '-जुलुमी सत्ताधीश. त्याच्या फेरबदलाचे विचित्र चक्र कसे कोण फिरवितो ते कोणालाच कळत नाही. त्याविषयी कोणी काळजी किंवा पर्वाही करीत नाही. कोणी लोकप्रिय नटी, किंवा नेभळा शानषोकी, खुशालचेंडू, एखादी नवीशी टूम उपयोगांत आणितो. तीच पुढे चालू राहून तिची फ्याशन बनते. कसेही असो एकदा या फ्याशन्रूपी कंदुकाला गती मिळाली पुरे. सर्व दर्जाच्या लोकसमाजामध्ये, सरदार आणि निवळ धनाढ्य मंडळी, मध्यम सुखवस्तु वर्गातील गृहस्थ, वगैरे पासून तो थेट कामकरी लोकांमध्ये सुद्धां, या कंदुकाच्या गतीची लाट लीलेने तव्हांच जाऊन पोहोंचते. इंग्लंडामध्ये जातिभेद असा नाही. तरी तेथील लोकसमाजांत पृथक् पृथक् वर्ग ठाम ठरलेले आहेत. यांच्या परस्पर मर्यादाही तशाच कायम झालेल्या आहेत. वरिष्ठ वर्गातील लोकांना, कमी भाग्यवान् लोकांसारखा पोषाख करणे, अर्थातच पसंत नसते. सरदारांच्या खालच्या दजाउ लोकांमध्ये वरील दर्जा प्राप्त करून घेण्याची ईर्षा व चढाओढ पुष्कळच अधिक असते. काही वर्गातल्या लोकांना, सामाजिक बाबतींत वरिष्ठ लोकांचे अनुकरण करून, स्वत:च्या खऱ्या स्थितीच्या उलट, नसता डौल लोकांच्या नजरेस पाडण्याची विलक्षण हाव असते.पैशाची वाण सर्वसाधारणतः नसल्यामुळे त्यांना आपल्या २९३