पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/313

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. कांहीं टोप्या-टोपली-सुद्धा फारच विचित्र व विलक्षण असतात. त्यांतील काहींवर शोभेसाठी इतकी फुलं ठेवलेली असतात की, त्या टोप्या खरोखर चिमुकल्या बगीचाप्रमाणे दिसू लागतात. ब्रिटिश बेटांमध्ये हवापाण्यासंबंधानें विलक्षण व अचानक फेरफार होतात. तसेच व. तितकेच फेरफार तेथील लोकांच्या पोषाखामध्येही होणे शक्य असते. 'स्मार्ट सेट्'-षोकीन मंडळी-- उद्यां कसा विचित्र व विद्रूप पोषाख पसंत करील, हे केव्हांच कोणाला खात्रीने सांगता येणार नाही. तेथील लोकांची सांपत्तिक स्थिती पुष्कळच समाधानकारक असल्यामुळे त्यांना खुशाल हवे ते चोंचले सहज अमलांत आणितां येतात. अशा नव्या नव्या पोषाखाच्या तन्हांचे आंग्लो लोकांना जें वेड लागले आहे, त्यास उत्तेजन देत राहण्यांत, कापडवाल्यांचा फायदाच असतो. यामुळे त्यांचा धंदा वाढतो. इंग्लंडांत प्रत्येकजण ' फ्याशन'चे अनुकरण करण्याला भारीच उत्सुक दिसतो. एखादी नवी टूम सुरू होण्याचा अवकाश की एका इंग्रजी लोकप्रिय पद्यांत वर्णन केल्याप्रमाणे, 'प्रत्येकजण तेच करितो आहे ' असें ह्मणण्याची स्थिती होते. 'फ्याशन्च्या बाहेर राहणे आणि मरून जाणे बरोबर,'ही ह्मण नेहमी ऐकण्यात येते. सामान्य लोकांची समजूत व वर्तन साधारणत: याच वळणावर असते. तेही मोठ्या वस्तीच्या ठिकाणी तर अधिक प्रमाणाने दृष्टीस पडते. २९२