पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/312

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्राच्य व पाश्चिमात्य चालीरीती. ( त्यांचा चांगलाच उपयोग होतो हे खास असलें ) तरी त्यांच्यामुळे फारच त्रास व गैरसोय सोसावी लागते, ही गोष्ट कोणीही नाकबूल करणार नाही; असे इंग्रज लोक सुद्धां कबूल करितात. कोरा करकरीत व कडकडीत इस्त्री केलेला कालर-गळपट्टा-बरोबर बसविण्यांत, जी भानगड पडते व त्रास होतो, त्याच्या इतपत एखाद्याच्या मानसिक स्थैर्यामध्ये गडबड उडविणारी गोष्ट कचितच सांपडेल. तंग बुटांचा त्रास अंगवळणी पडणे, ही गोष्टही तिच्याच तोडीची आहे. अडीच इंच उंच, वज्राप्रमाणे कठिण, व कडक असें कॉलरचे वळे मानेला घालणे, आणि ढोराच्या कांतड्यांच्या दणकट व संकुचितशा बूटरूपी साच्यांत पाय कोंबून भरणे, ही दोन्ही दुस्सह प्रायश्चित्तें खुषीने कबूल करणे, त्या युरोपियन लोकांचेच काम होय. त्यांच्या अंतरंगांत प्रवेश न झालेल्या मंडळीला, हे पुरुषांच्या पेहरावांतील विचित्र प्रकार सुद्धां, स्त्रियांच्या पोषाखांतील अर्वाच्य तन्हांच्या मानाने, कमी कठिण अशा कूट प्रश्नाप्रमाणे वाटतात. हल्ली स्त्रियांच्या पोषाखांचे जे प्रकार प्रचलित आहेत त्यांत, मान उघडी, तंग झगे, बाजू उभ्या चिरलेल्या आणि आंतील व अंगाबरोबरच्या कापडाचें प्रदशर्न करणारा, असा पोषाख, हे खरोखर न शोभणाऱ्या अर्वाच्यपणाचे कळस होत. युरोपियन स्त्रिया घालतात त्यांपैकी २९१