पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/311

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतचा प्रवास. हवापाण्याच्या संबंधाचा असो, किंवा शेकडो वर्षांच्या जुन्या. परंपरेच्या अनुरोधाने चालत आलेल्या सभ्यपणाच्या वगैरे कल्पनांमुळे त्यांचा प्रघात पडलेला असो. खुद्द पूर्व व पश्चिम यांच्यामध्ये जितका फरक आहे, तितकाच तिकडील पेहरावामध्ये फरक आहे, हेही जाताजातां मला नमूद करून ठेविले पाहिजे. प्रत्येक देशांतील सार्वजनिक पोषाखाची तन्हा कायम ठरण्याला, तेथील हवापाणी, व सोई, पुष्कळ अंशाने कारण होतात यात शंका नाही. हिंदुस्थान देश सामान्यतः उष्ण असल्याने तिकडील लोक हलके व सैल कपडे वापरतात. अशा प्रकारचा पेहराव करण्यांत त्यांचा हेतू हा. आहे की, त्या योगाने शरीराला शक्य तितकी जास्त ताजी हवा मिळावी. कारण, स्वच्छ हवा ही शरीरावरील चर्माचें निसर्गसिद्ध जीवन असून तिच्याशिवाय आरोग्य राहणे शक्य नाही. पाश्चिमात्य देशांतील परिस्थिती याच्या उलट. तिकडे अंगाबरोबरच कपडे पाहिजेत.त्यांच्या योगाने मनुष्य सुटसुटीत, व कार्यक्षम राहातो. यामुळेच पूर्वेकडील लोक ऐदी व संथ, तर पश्चिमेकडील युरोपियन लोक उलट चलाख व तरतरीत. असतात. जन्मादारभ्य हिंदुस्थानी रीतीरिवाजामध्ये वाढलेल्या लोकांना कडकडीत 'कालर्स'–गळपट्टे-आणि तंग बूट घालण्याचा उपयोग किंवा हेतू लक्षात येत नाहीत. ते कांहीं असोत.. २९०