पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/310

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्राच्य व पाश्चिमात्य चालीरीती. नेमस्तपणानेच बहुधा खरी प्रगती लाभत असावी, असे दिसते. प्रत्येक देशांतील चालीरीती निरनिराळ्या असून, देशादेशांत ज्या त्या देशास स्वतःच्या विशिष्ट चालीरीतींची मोठी आवड तरी असते अथवा त्याविषयी त्यांना एक प्रकारचा अभिमान तरी वाटतो. फ्रान्स व इंग्लंड दोन्ही देश शेजारी शेजारी त्यांच्यांत सुद्धां या गोष्टी खऱ्या आहेत. तेव्हां विलायत आणि हिंदुस्थान, यांच्यासारख्या अतिशय अंतरावर असलेल्या राष्ट्रांसंबंधाने, त्या आधिकच खऱ्या असणार. त्यांच्यांतील हवापाणी, मनुष्यस्वभाव, पुरातन दंतकथा, तसेंच सुख समाधान व सभ्यपणाविषयी निरनिराळ्या कल्पना, इत्यादिकांमुळे त्यांच्यांतील भेदवाद अधिक उत्कट व तात्काळ डोळ्यांत भरणारा असा झाला आहे. या दोन्ही राष्ट्रांतील लोकसमाजाच्या रीतीरिवाजांमधील वैलक्षण्याचे यथार्थ वर्णन करणे, काही सोपे नाही. त्यांच्यांतील फरक बरेच सर्वविश्रुतही आहेत. तेव्हां त्यांचे मी येथें विस्तृत वर्णन करू इच्छित नाही. त्यांतील काही रूढी फारच प्राचीन आहेत. त्यांचा मूळारंभ युगाची युगे लोटल्यामुळे, जणों प्राचीन काळच्या धुक्याआडसा लोपलेला आहे. दुसऱ्या कांही चालीरीती नियतस्थलविशिष्ट आहेत. कोणच्याही समजांतील पुरातन चालीच्या मुळाशी काही तरी विशिष्ट कारणाचा पाया असतो, हे ध्यानात ठेविले पाहिजे. तो पाया २८९