पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/309

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग एकविसावा. प्राच्य व पाश्चिमात्य चालीरीती. — रूढीचे बंदे गुलाम कालाची खेळवणीं होत. ' बेकन. 'आपणाजवळच्या वस्तूंच्या मौल्यवानपणावर सुखसमाधान अवलंबून असत नाही. ते स्वतःच्या गरजा कमी असण्यापासून प्राप्त होते.' _गोड्स्मिथ.. वरील उताऱ्यांतील अनुस्यूत तत्त्वांची सत्यता, विशेषतः प्राच्य व पाश्चिमात्य देशांतील चालीरीतींना अधिक अंशाने. लागू पडते, असे म्हणता येईल. चालीरीती व रूढी यांनी जखडून टाकलेले व त्यामुळे जणों निरनिराळ्या कोठड्यांमध्ये कोंडून ठेविले गेलेले असल्याने राष्ट्र या नात्याने हिंदी लोकांचें अत्यंत नुकसान झाले आहे, असें ह्मणावे तर, इकडे इंग्रज लोक नेहमी फेरफाराच्या अधीन असल्यामुळे त्यांनाही, सदा चंचल व मनसोक्त वर्तन ठेवीत जाण्याचा परिणाम, मनाची अस्वस्थता उत्पन्न करण्यांत होत असून तीच या चंचलपणाचें शासन होय, या गोष्टींची आठवण करून देणे अवश्य आहे.. २८८