पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. म्हटले आहे. आणि ग्रेट ब्रिटनमध्ये हल्ली असलेले लोक हे त्यांचेच कायदेशीर व खरे वारस आहेत हे खास ! . परंतु व्यापाराच्या कामी त्या वेळी फक्त रोमन लोकच तेवढे पुढारी होते काय ? मला वाटतें नाहीं ! आमच्यांतील एक -वर्ण-वैश्य वणिक्-वर्गच ध्याना, त्यांनी सर्व त-हेच्या व्यापारधंद्याकडे लक्ष द्यावे, अशी त्यांना शास्त्राज्ञा आहे. त्यांनी व्यवहारामध्ये पुर्ते प्रावीण्य संपादन केले पाहिजे. रोमन लोक प्राचीन भूभागावरील बोहोरे बनले, त्यांच्या किती तरी पूर्वीच आमच्या वैश्यांना ही शास्त्राज्ञा मिळालेली होती. रोमन लोकांनी राजकारण व व्यापार यांची सांगड घातली. हिंदुस्थानांत या दोहोंची फाटाफूट झाली, व त्यामुळे शेवटी दोहोंचीही दुर्दशा झाली. आर्य लोकांच्या हातून घडलेल्या कित्येक चुकांपैकी ही एक होय. तीच बहुधा त्यांच्या हासाला कारण झाली असावी. आम्हां अलीकडच्या लोकांची परिस्थिति निस्संशय अधिक अनुकूल व फायद्याची आहे. आजवर सांठत आलेल्या शहाणपणाची ठेव हल्लीच्या पिढीस परंपरेने मिळालेली आहे. आणि कोणतीही गोष्ट पूर्वीपेक्षा किती तरी उत्तम रीतीने करण्याचे निरनिराळे मार्ग आम्हांला लाभले आहेत. पण राष्ट्राला मोठेपणा येण्याला साधनभूत साहस, धैर्य, मानसिक बल, सार्वजनिक जोम, सत्यप्रेम, सद्वर्तन, व चोख व्यवहार इत्यादि सद्गण अंगीं असतील त्यांनाच वरील फायद्यांची खरी किंमत आहे. १०