पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/308

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इंग्लंडांतील बाग. क्वचितच कायम आहेत. तेव्हां ऐतिहासिक दृष्टीने ज्यांचे महत्त्व आहे अशा वस्तूंविषयीं तर बोलावयासच नको. युरोपांतील लोकांमध्ये पुष्कळच विशदपणे दिसून येत असलेल्या ऐतिहा. सिक भावनेची आम्हां लोकांमध्ये फारच उणीव असणे ही गोष्ट शोचनीय होय. तिकडे सातशे आठशे वर्षांपूर्वीचे रंगित कांचेचे काम, सहज, मोठ्या प्रेमाने दाखवितात व लोकही तें आवडीने पाहतात. त्यांच्या मध्ये ऐतिहासिक महत्त्वाच्या वस्तूराजवाडा, मंदिर, किंवा कोणा सरदाराची उपवनवाटिका वगैरे काळजीपूर्वक जोपासना करून ठेवण्याची पद्धत भारी विलक्षण दिसून येते. इंग्लंड देशाला अतिशय प्राचीन सुधारणेविषयी प्रतिष्ठा मिरविण्याचे साधन नसले तरी, स्वत:च्या पूर्वकालीन इतिहाससंबंधी पुरती व खात्रीलायक माहिती उपलब्ध आहे, ती, ह्या देशाला या बाबतीत हिंदुस्थानापेक्षां पुष्कळ पुरातन संबंधाला नेऊन पोचविते.आमच्या देशाच्या प्राचीनत्वाविषयी आम्हाला अभिमान आहे, व आमच्या प्राचीनतर सुधारणेच्या संबंधांत आह्मी सुसमृद्ध होतो. पण आमच्यामध्ये खरें ऐतिहासिक महत्त्वाचे सलग वृत्त, असे फारच कमी अवशिष्ट राहिले आहे; आणि जे थोडेसे आहे, तेंही दंतकथात्मक व पौराणिक कालांतल्या व्यक्तीविषयींचंच आहे. २८७