पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/307

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. समोर, उग्र प्रायश्चित्त घेतले. त्याविषयींची कथा, तसेंच, तेथे भरणाऱ्या यात्रा व घडून येणारे दैवी चमत्कार, यांविषयींच्या गोष्टीही मी ऐकिल्या. त्या महात्म्याच्या समाधीच्या दर्शनास येऊन, तिच्यापुढे गुडघे टेकून प्रार्थना करणाऱ्या सहस्रावधि भाविक लोकांच्या गुडघे टेकण्यामुळे पडलेल्या खांचाही मी पाहिल्या. तेव्हां मला तात्काळ आपल्या देशांतील धर्मभोळ्या समजुतींचे स्मरण झाले. पाश्चिमात्य देशही थोड्याशा काळापूर्वी, ज्याच्या संबंधाने प्राच्यदेशीयांना आजकाल नांवे ठेवली जातात, तसल्याच अंधश्रद्धेच्या स्थितीत होते, ही गोष्टही माझ्या ध्यानात येऊन चुकली. प्राचीन इतिहास व दंतकथा, याच्याशी संबंध असलेल्या वस्तू व गोष्टी नीट जतन करून ठेवण्याच्या कामी, युरोपांतील देशांमध्ये फार कळकळीची खबरदारी घेतली जाते; ही गोष्ट माझ्या मनावर ठसली. अमूक एक गोष्ट कोठे व कधी घडून आली, याचे इतिहासकार बरेंच खात्रीपूर्वक वर्णन कारितात. आमचा देश फार प्राचीन असून त्याच्यांत पुरातन दंतकथांची समृद्धी आहे. पण परकीयांनी केलेल्या स्वाऱ्या, लुटालूट, जाळपोळ, व राज्यक्रांति, इत्यादिकांपासून त्याला दुस्सह ताप सोसावा लागला आहे. पाहावे तिकडे दृष्टीस पडणाऱ्या अश्वत्थ वृक्षांनी जुन्या इमारती नामशेष होण्याला बरीच मदत होत आहे. या सर्व कारणांनी प्राचीन इमारती ૨૮૬