पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/306

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इंग्लंडांतील बाग, त्या रक्षेमधून, त्याचे पुनरपि अधिकच भव्य व थाटदार उज्जीवन झाले. त्याच्यांतील शेवटचे झालेले काम म्हटले म्हणजे त्याच्या प्रचंड 'टॉवर', होय. तो स. १४९५ साली बांधला गेला. टॉमस अ बेकेट चा खून झाला तो येथेच. त्याचे प्रेत पडलेली जागा अद्यापि दाखवितात. या क्याथेडलच्या 'क्रिप्ट'वेदी खालील भुयारा-मध्ये एलिझाबेथ् राणीने नामंडी मधून आलेल्या प्रोटेस्टंट लोकांना, आपले माग चालविण्याला परवानगी दिली. त्या लोकांच्या वंशजांना, तेथील एक लहानसा भाग, हलींसुद्धां, स्वतंत्रपणे प्रार्थना करण्यासाठी उपयोगांत आणूं दिला जात आहे. तेथे प्रार्थना होते ती फ्रेंच भाषेमध्ये. या इमारतींत ज्या दुसऱ्या ऐतिहासिक महत्त्वाच्या वस्तू आहेत, त्यांच्यामध्ये ब्लॅक प्रिन्स, चौथा हेन्री राजा, त्याची राणी, त्याचा बंधू व पुत्र, तसेच पुष्कळसे 'प्रीलेट्स,' 'आर्चबिशप्स' इत्यादिकांची थडगी, यांचा समावेश होतो. हल्लींच्या स्थितीत सुद्धां ही अद्वितीय इमारत ह्मणजे, धर्मसंबंधी इमारतीच्या शिल्पकलेची प्रगती होत जाण्याला कारण झालेल्या अनेक गोष्टींच्या नमून्यांचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. टॉमस् अ बेक्केट याचे थडगें' रिफार्मेशन'च्या वेळी उद्धस्त केले गेले होते. त्याची जागा मला दाखविण्यांत आली. दुसऱ्या हेन्री राजाने या धर्मगुरूच्या खुनाप्रीत्यर्थ, त्या थडग्या २८५ १९