पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/305

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास तरी पण क्यांटरबरीची विशेष ख्याती आहे ती इंग्लंडांतील धार्मिक जीवनाचे मुख्य केंद्र किंवा अधिष्ठान या नात्याने होय. क्यांटरबरी येथील आर्चबिशप'हे साऱ्या इंग्लंडांतले'लॉर्ड प्रायमेट' -धर्मसंबंधाच्या बाबतीत सर्वांहून वरिष्ठ आधकारी-आहेत. तसेंच, साऱ्या जगांतील उत्तमोत्तम भव्य 'क्याथेड्रल्स' पैकी एक, असें 'क्याथेड्रल' तेथे आहे. या दोन गोष्टींमुळे मुख्यतः त्या शहरास इतकें महत्त्व प्राप्त झाले आहे. या बादशाही इमारतीच्या आवारांतच 'आर्चबिशप'ची राहण्याची जागा आहे. इंग्लंडांतील अगदी अव्वलचे खिस्ती मंदिर हेच होय. तें सेंट ऑगस्टाईन् व किंग एथल्बर्ट यांच्या वेळचे आहे. धार्मिक इमारतींच्या शिल्पकलेच्या साध्या ओबड धोबड त-हेपासून तो सर्वोत्कृष्ट अशा गॉथिक शिल्पकलेच्या अत्युत्तम नमून्यापर्यंतच्या सर्व त-हा, तेथे दिसून येतात. त्या इमारतींमध्ये वेळोवेळी किती तरी फेरफार झालेले आहेत. डेन्स लोकांच्या हातून स. १०११ साली त्याचा नाश व्हावयाचा थोडक्यांत टळला. पुढे १२ वर्षांनी क्यान्यूट राजाने त्याचा जीर्णोद्धार केला. सं० १०६७ मध्ये त्याचा अग्निकोपाने नाश झाला. नॉर्मन लोकांनी इंग्लंड देश काबीज केल्यानंतर आर्च बिशप लॉन्फ्राँक याने तें. मंदिर पुनः बांधले. त्याच्या मागून आन्सलेम हा 'आर्चबिशप' झाला. त्याने त्याचा पूर्वेकडील भाग पाडून, तो जास्त भव्य व शोभिवंत बांधविला. बाराव्या शतकांत अग्नीने त्याची पुनः आहुती घेतली. त्यानंतर २८४