पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/303

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. उघडे पडते. ते पाण्यात बुडालेले असतांना, त्याच्या पासून नावाड्यांना किती व कसा धोका असतो, ते आमाला कळून आले.ही वाळवंटें जवळ आहेत, हे सुचविण्यासाठी दीप स्तंभाप्रमाणे उपयोगी पडणारी जहाजे ठेवलेली आहेत. धुके असतांना या वाळवंटां संबंधानें सूचना देण्याकरितां . त्यांच्या वरून, तास, शिंगे व शिट्या, वाजवितात. याशिवाय जागजागी पुष्कळसे 'बाय' बोयरे-ही रोवलेले आहेत. ... ही वाळवंटें पूर्वी इंग्लंड बेटाला लागूनच होती, व ज्यूलियस् सीझर उतरला, तो येथेंच, अशी दंतकथा आहे. या वाळवंटांच्या जागी पूर्वी एक बेट होते, व त्यावेळी कोणी -लॉर्ड गुड्विन् नांवाचा त्याचा मालक होता. त्याच्या पापी आचरणामुळे ईश्वरी क्षोभ होऊन ते बेट बुडालें, असेंही सांगतात. ही गुड्विन्सची वाळवंटें कशीही झाली असोत, त्यांनी पुष्कळच बळी घेतले आहेत, हे मात्र खास आहे. येथील अपघात कमी करण्यासाठी, होईल तितकी खबरदारी घेतात. तरी पण ते होतातच. महासागराच्या अफाट साम्राज्यामध्ये, रेतीत अर्धवट दबलेले, असे गलबतांचे अवशेष, अद्यापि दृष्टीस पडतात. याचा उल्लेख वर आलाच आहे. हे अपघात होतात ते, रात्री अंधेरांत, भयंकर गर्जना करणारी वादळे सुरू असतांना. अशा वेळी समुद्रात बुडून मरण्याच्या संकटांत सांपडलेल्या हतभागी लोकांचे प्राण वाचविण्यासाठी आमचा २८२