पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/302

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इंग्लंडांतील बाग. चालला तसे, कांहीं 'सील ' मासे या वाळवंटाकडे येत असल्याचे दिसले. ते पाहून आम्हांला असे वाटले की, या बेटावरील आमच्या राजसत्तेवर जणों ते हक्क सांगण्याकरितांच की काय आम्हांकडे येत आहेत. त्यांचे यथास्थित स्वागत करण्याला आली तयार झालो. आमच्यांतील विशेष साहसी मंडळी, त्यांना चुचकारूं लागली. पण, धिटाई व शौर्य यांच्या पेक्षाही शहाणपण बरें, असें समजूनच जणों, ते रोख बदलून दिसेनासे झाले. ओहोटीच्या वेळी बाहेर येऊन ते या वाळवंटावर ऊन खात .पडतात, असें तांडेलाने सांगितले. ही रेती लाटांचा तडाका कशी आपोआप कमी करिते. तें, येथे उभे असतांना सहज लक्षात येते. भरती उलटून पाणी ओसरतें तेव्हां ती बरीच घट्ट होते. तुफानांतल्या लाटा भारी जोरानें उसळतात. त्या किनाऱ्यावर आदळून त्यापासून पुष्कळ नुकसान व्हावयाचे, पण त्याला ही रेती आड येते. कांहीं जागी तिच्यावर उभे राहतांच, ती जणों त्रासाने खाली दबते. त्यावेळी पडलेली खेंच स्पष्ट अनुभवास येते. एखादें प्रचंड जहाज अशा जागी येऊन आदळले तर, त्याच्या धक्क्याच्या सपाट्याने, तें त्या रेतीतल्या भोवऱ्यांत कसें गडप होऊन जाईल याची सहज कल्पना होण्यासारखी आहे. ओहोटीच्या वेळी, कोसों गणती वाळवंट २८१