पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/301

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. होत्या. तिच्या मदतीला गेलेल्या धाडसी व शूर मंडळीमध्ये आमचा 'पायलट'-वाटाड्या-ही होता. त्या आगबोटीवरील सर्व खलाशी व बराचसा माल, कसा वांचविला, तें त्याने आमांला सांगितले. याचप्रमाणे दगावलेल्या दुसऱ्या कित्येक गलबतांचे भाग पाण्यावर दिसत होते ते महाभूतांच्या आघातामुळे काळे ठिक्कर पडले होते. 'गुडविन्स ' जवळ गेलो तसें, आमच्या रंगेल तांडेलाने सांगितले की, बर्जेस् नांवाचा साहसी गृहस्थ, ' चानेल '-इंग्लिश खाडी-पोहत ओलांडून, फ्रान्सला पोहोंचला त्यावेळी, आम्ही बसून चाललेली बोटच त्याच्या बरोवर होती. सुमारे एक तासानंतर, दूर पिंगट रंगाची रेषा दिसू लागली. तसे आह्मी त्या वाळवंटाजवळ पोहोंचलों असें दिसून आले. दुसरी एक लहानशी होडी बरोबर आणलेली होती. तिच्यांतून वल्हवीत जाऊन आम्ही एका सोईवारशा जागी उतरलो. तें वाळवंट अगदीं रूक्ष व निर्जन असून त्याच्या चोही बाजूला पाणी होते. त्याच्यावर पाय ठेवतांच मनांत जी भावना उत्पन्न झाली ती अगदीच चमत्कारिक होय. किनाऱ्यावरील रेतीवर समुद्राच्या लाटा आदळून पांढरा शुभ्र फेस उसळत होता. दृक्पथांतील आखिल भागाचे जणों आम्ही त्यावेळी राजे झालो होतो, व आम्ही व्यापलेल्या मुलु-खाचा आमचा निर्विवाद ताबा होता. ऊन पडून उबारा येत २८०