पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/300

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इंग्लंडांतील बाग. मजेदार झाली. आक्टोबर महिन्यांत एका स्वच्छ व निरभ्र दिवशी तिसरे प्रहरी आह्मी एका प्रशस्तशा ' मोटार लाँच ' मधून, 'बीच 'बाळवंटा-वरून समुद्रकिनाऱ्याहून निघालों.. या सफरीसाठी लागणारे सारे सामान बरोबर घेतले होते. त्यावेळी नीलवर्ण समुद्रजलावर सुरेखसे सूर्यकिरण चमकत होते. हवा मंद व सुखस्पर्श होती. यामुळे तो दिवस जणों जून महिन्यांतून उसना आणल्याप्रमाणे वाटत होता. समुद्र शांत होता. त्याच्या पृष्ठभागावर लहरीचें नांव सुद्धा नव्हते परंतु आम्ही निघाल्यानंतर तांडेलानें चढविलेला 'युनियन जॅक' चा बाव्हटा मजेदार फडकत राहील येव्हढी मात्र वाऱ्याची झुळूक चालली होती. ह तांडेल एक नमूनेदार 'ओल्ड सॉल्ट'पक्का मुरलेला-खलाशी होता. त्याच्या अंगी स्वदेशाभिमान पूर्ण भरलेला होता. त्याचा बांधा भक्कम व शरीरकाठी सुरेख कसलेली होती. त्याला यावेळी शांत दिसणाच्या त्या दर्यातील प्रत्येक बोट बोटभर जागा पूर्ण परिचित होतीसें दिसले. हा समुद्राचा भाग मोठा धोक्याचा आहे. त्याच्यांत दगावलेल्या , गलबतांचे अवशिष्ट भाग, आमांला वाटेंत बरेचसे दृष्टीस पडले.. त्या विषयींची पुष्कळशी माहिती तांडेलाने आम्हाला सांगितली. सुमारे ६५०० टनांची 'मराठा' नांवाची, कलकत्ता व लंडन . यांच्यामध्ये चालणारी, सण, रबर, चहा वगैरे माल भरलेली आगबोट, चार वर्षांखाली या भागांत अदृश्य अशा रेतीच्या । तारावर आदळून बुडाली. तिच्या डोलकाठ्या अद्यापि दिसत ..२७९