पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/299

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. 2. मोठ्या प्रमाणावर चालतो, अशी प्रसिद्धी आहे. सुरेख वाळ वंटें व डोंगराचे कडपे असलेले मारगेट, सुंदर घरे व 1. मनोहर कुरणे असलेले फोक्स्टन, आणि भव्य व प्राचीन किल्ला, समुद्रकाठी प्रशस्त परेडीची जागा, व भपकेदार दुकानें असलेले डोव्हर, हे सर्व गांव चांगले पाहण्याजोगे आहेत. साऱ्या विलायतेंत डोव्हरचा किल्ला अतिशय भव्य व शानदार किल्ल्यांपैकी एक आहे. त्याची मजबूत तटबंदी, व गोल बुरुज, फिनीशियन्स, रोमन्स, सक्सन्स, व नॉर्मन्स या लोकांपैकी प्रत्येकांनी क्रमाक्रमाने बांधलेले आहेत. दीपस्तंभ प्रचारांत येण्यापूर्वी, तेथील उंच इमारतीवरून, रणशिंग वाजवून, दर्यावर्दी लोकांना इषारा दिला जात असे. ते शिंग आह्मी पाहिले. या किल्ल्यांतील एक भाग, नेपोलियनशीं चाललेल्या युद्धाच्या वेळी, वेलिंगटन् यांनी बांधविलेला होता.. त्या किल्ल्यांत तळघरे व भुयारे आहेत. ती सुमारे दोन मैल लांब आहेत. त्यांच्यांत अलीकडे कोणाला जाऊ देत नाहीत. पण यांपैकी एका भुयारांत जाऊन येण्याची आमाला परवानगी मिळाली. या किल्ल्याच्या आजूबाजूला असलेले बालेकिल्ले व इतर इमारती मिळून हा किल्ला फार मजबूत, भव्य व विस्तीर्ण झालेला आहे. आसपासच्या प्रदेशांतून त्याचा देखावा फारच चांगला दिसतो. ____वामर येथे असतांना प्रसिद्ध 'गुडविन सँड्स ' वरही आह्मी एकदां जाऊन आलो. ही सफर भारी उत्साहजनक व २७८