पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

समुद्रांतील सफर. पियामिड्स बांधल्या त्यांना हेही शक्य होतें–तर हिंदुस्थानाचा, सारे युरोप व विशेषतः ग्रेट ब्रिटन यांच्याशी, संबंध निराळ्या त-हेचा झाला नसता असे कोणी म्हणावें ! मी एवढे जाणतों. की, प्राचीनकाळी पाश्चिमात्य राष्ट्रांना पूर्वेकडील देशांशी निकट संबंध असावा अशी नेहमीं भारी उत्कट इच्छा होती. त्या राष्ट्रांतील सर्वांत शहाणे लोकांना आमच्याकडून किती तरी गोष्टी शिकण्यासारख्या आहेत,याची चांगली जाणीव होती. भूमध्यसमुद्र मला फार आवडला. त्यांतही त्यांतील गरम हवेचे भाग. तो समुद्र किती तरी विलक्षण व चमत्कारयुक्त आहे ! त्यांत शिरल्यावर माझ्या मनामध्ये पुढील कल्पनातरंग आल्यावांचून राहिले नाहीत. या समुद्राला भरती ओहोटी बहुतेक नाहींच ह्मणावयाची. या इतिहासप्रसिद्ध जलमार्गाने युगाची युगें सारखीं, इजिप्शियन सालोमन बादशहाच्या वेळचे यहूदी आणि अथीनियन या लोकांची तारवें, रोमन लोकांची गलबतें, विजयी व प्रतापी मुसलमान लोकांची तुर्की जहाजें, व्हिनीशियन लोकांचे गंडोले आणि शेवटी 'नाईल' च्या लढाईत विजय मिळविण्यासाठी गेलेली ग्रेट ब्रिटनची लढाऊ मनवारें, किती तरी आली गेली ! त्याच्या दोन्ही तीरांवर रोमन लोकांचा अंमल गाजत होता. त्या काळासंबंधाचे विचार तर माझ्या मनांत आल्याखेरीज राहिले नाहीत. प्राचीन रोमन लोक म्हणजे तत्कालीन ज्ञात भूमंडळाचे ( व्यवहारी ) व्यापारी, असे कोणींसें