पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/298

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इंग्लंडांतील बाग. मानाने उणे दिसण्या जोगे नाहीत. 'टौन हॉल'च्या लगतच 'बोर्ड ऑफ ट्रेड'-व्यापारी संघ-शी संबंध असलेली 'लेबर 'एक्सचेंज'-उद्योगविनिमया-ची इमारत आहे. तेथे नोकरीच्या रिकाम्या जागांचे ' रजिस्टर ' ठेवलेले असते. त्या ठिकाणी नोकरीच्या शोधार्थ फिरणान्यांना फुकट अर्ज करितां येतो. अशा 'लेबर एक्सचेंजेस' इकडे सर्वत्र आढळतात व त्यांच्यामध्ये एकमेकास निरोप पाठविण्याकरितां टेलिफोनची व्यवस्था केलेली असते. त्यामुळे उमेदवार मंडळीला नोकरीसाठी हवें तेथें तात्काळ पाठविता येते. अडचणीच्या प्रसंगी त्यांना आगाऊ भाडे देऊनही पाठवितात. वामर सारख्या लहान गांवांत या कामाकरितां स्वतंत्र आफिसाची सोय नसल्याने, रिकाम्या जागेच्या यादी पोस्ट ऑफिसांत टांगून ठेवतात. आह्मी तेथे असतांना, आसपासची बरीच प्रेक्षणीय स्थळे, माटार मधून पाहून आलो. त्यापासून आमांला मोठा आनंद वाटला. त्यांतही विशेषतः सांडविचला गेलों, ती आमची सफर फारच मजेची झाली. हे एक चमत्कारिक शहर असून पुरातन वस्तुसंशोधनाच्या संबंधाने या गांवाचे महत्त्व विशेष आहे. प्राचीनकाळी हे भरभराटीचे बंदर होते. पण समुद्र मागें हटत चालल्यामुळे ते आतां दूर आंत राहिले आहे. रॅम्सगेट हैं मोठे थोरले बंदर असून, तेथे मासे धरण्याचा धंदा फार २७७