पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/297

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. इन्साफाचे काम होत होते. या कोर्टात पूर्वीचे 'मेयर्स' व इतर स्थानिक प्रसिद्ध मंडळी, यांच्या तसबिरी टांगलेल्या आहेत. तसेच या ठिकाणी डील येथील प्राचीन 'लग्गर्स' दुकाठी अथवा तिकाठी जहाजे व मासे धरणा-या लोकांच्या होडया इत्यादिकांचे नमूने आणि रोमन लोकांच्या स्वारीची स्मारकें, जुनी नाणी, कुंभारकाम, अस्थि ठेवण्याची मडकी, वगैरे वस्तू ठेवलेल्या आहेत. जवळच्या ' कौन्सिल चेंबर' मध्ये स्थानिक अंमलदार कमेटीच्या सभा भरतात. तेथेही पूर्वीच ' मेयर्स, आल्डरमेन् व कौन्सिलर्स ' यांच्या तसबिरी पाहण्यांत आल्या. निघण्यापूर्वी तेथील व्हिजिटर्स बुक' मध्ये सही करण्याकरितां आझांस पाचारण करण्यांत आले. तेव्हां आली लॉर्ड लोर्बन यांच्या सहीखाली सह्या केल्या. डील येथील ‘टौन हॉल' साधाच असल्यामुळे पाहण्याचा सहून जाण्याचा संभव आहे. येथील कौन्सिलाने अशा मौल्यवान् इमारतीकडे खर्च करण्या ऐवजी शक्य तेवढा उपयोगी कामाकडे पैशाचा विनियोग करण्यांत बराचसा दूरदर्शीपणा दाखविला आहे. गेल्या थोड्याशा वर्षांत त्यांनी ( डेनेज) घाण वाहून नेण्यासाठी गटारे बांधणे, पाण्याचा पुरवठा, दिवाबत्ती, व रस्त्यावर फरसबंदी, अशा लोकोपयोगी कामांमध्ये महत्त्वाच्या सुधारणा केल्या आहेत. रस्ते उत्तम स्थितीत राखलेले आहेत. ते इंग्लंडांतील इतर कोणच्याही शहरांतील रस्त्यांच्या .२७६