पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/296

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इंग्लंडांतील बाग. लागतो, आणि बरोबर एक वाजतां नेमानें खाली पडतो. लोक डील येथे राहण्याला येतात त्या दिवसांत, ही मजा पाहण्याला गर्दी जमते. त्याच्यावरून घड्याळे लावण्याला सर्वांना सोईचे पडते. 'धि रॉयल मरीन लाइन इन्फंट्री' चे निळ्या रंगाचे व एक नमून्याचे नीटनेटके पोषाख घालून फिरत असलेले शिपाई, डील व वामर येथील रस्त्यांत नेहमी पाहण्यांत येतात. त्यांच्या बराकी, 'वामर डिस्ट्रिक्ट' मध्ये आहेत. त्यांत दोन हजार शिपायांना प्रशस्तपणे निजण्याच्या जागा, भोजनशाला व क्रीडागृहे, स्नानाच्या जागा, परेडीची मैंदाने, खेळण्याची पटांगणे, वगैरे आहेत. तसेच लष्करी लोकांच्या उपयोगासाठी एक मोठे चर्चही आहे. त्याच्या पायाचा दगड लॉर्ड जार्ज ह्यामिल्टन यांच्या हातून बसविला गेला होता. डीलच्या स्थानिक स्वराज्यसंस्थेचा इतिहास मजेदार आहे. त्याच्या कार्पोरेशनची मूळची सनद सुमारे दोनशे वर्षांपूर्वी मिळाली, होती. ती 'म्युन्सिपल रिफॉर्म अॅक्ट' पास । झाल्यावर रद्द करण्यांत आली, आणि तिच्या ऐवजी नवीन सनद देण्यांत आली होती. तेथील 'टौन क्लार्क' मिस्तर ए. सी. ब्रौन यांनी, कृपा करून आम्हांला तेथील म्युन्सिपल इमारती दाखविल्या. प्रथम आमी म्याजिस्ट्रेट कोटाँत गेलो. तेथें आरोपी लोकांची चौकशी होऊन, गुन्हेगारांना शिक्षा करण्याचें, न्याय