पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/295

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. त्यासंबंधाने आम्हां उभयतांचेही मनोरंजन होण्यासारख्या बऱ्याचशा विषयांवर आम्ही बोलत होतो. डील व वामर या दोन्ही जागी, मुलांच्या शिक्षणाची सोय फार चांगली आहे. आसपास खासगी शिक्षण देण्याच्या बऱ्या-- चशा संस्था आहेत. तेथील सार्वजनिक प्राथमिक शाळांमध्येही कोण्या प्रकारची उणीव आढळण्याजोगी नाही. हिंदुस्थानांतील या दर्जाच्या शाळांच्या मानाने, त्या सर्व गोष्टीत पुष्कळ. श्रेष्ठ आहेत. वामर येथे कॅनडारोडवर असलेली अशी एक. शाळा मी पाहिली. तेथेही टार्केप्रमाणे सर्वत-हेनें परिपूर्ण अशी शिक्षणपद्धती सुरू आहे. तिचा माझ्या मनावर चांगला परिणाम झाला. इकडे शिक्षण सक्तीचे असल्याने शिक्षणाच्या सर्व सोयींनी युक्त अशा उत्तम संस्था, लहान सहान खेड्यांतून सुद्धां आढळून येतात.... येथे येणाऱ्या लोकांना सदैव कौतुक वाटणारी चीज ह्मणजे ब्यांड स्टाँड ' जवळ ठळक जागी उभा केलेला, ' टाइम बॉल '–वेळ दाखविणारा गोळा-ही होय. गलबतावरील अधिकाऱ्यांना घड्याळे नीट लावतां येण्यास साधनीभूत व्हावें असा ही योजना स्थापन करण्याचा मूळ उद्देश होता. वेळ बरोबर दर्शविली जावी ह्मणून यांतील यंत्रांचा संबंध 'ग्रीनविच ' च्या वेधशाळेशी विद्युच्छक्तींने जोडण्यात आला आहे. तो गोळा एक वाजण्यापूर्वी काही थोडा वेळ वर चढूं ૨૭૪