पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/294

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इग्लंडांतील बाग. सुंदर बाग आहेत व जवळच एक सुंदर खोरे आहे. हे दोन्ही मिळून, हे एक फारच प्रेक्षणीय व रम्य स्थळ झालेले आहे. खंदकामध्ये एक फार मोठे व जुनें अंजीराचे झाड आहे. त्याला अद्यापि फळे येतात. इतके जुने झाड, साऱ्या इंग्लंडांत इतर कोठे क्वचितच असेल. याचप्रामाणे डील येथील किल्लाही अत्यंत मनोहर आहे. तो या राजपथाच्या दक्षिण टोकास पाहरेकन्याप्रमाणे उभा आहे. लॉर्ड जॉज ह्यामिल्टन हे या किल्ल्याचे 'क्यापटन्'मुख्याधिकारी-असून ते त्यांतच राहात असतात. तो मजबूत व भक्कम बांधलेला आहे. त्याच्या मध्यभागी 'टॉवर'-उंच मनोराअसून सभोवताली तटबंदी आहे. त्याच्या वरून पाडतां उचलतां येण्याजोगा एक पूल आहे. त्यांतील दालनांमध्ये शहानशहा सातवे एडवर्ड यांच्या राज्यारोहणसमारंभाला हजर असलेल्या हिंदी राजे लोकांच्या कांहीं अत्युत्तम तसबिरी, आणि "पूर्वीचे 'वार्डन्'-किल्लदार-लोकांची व इतरांची कोरीव काम केलेली आणि एन्ग्रेव्हिग्स्-छापील-चित्रे आहेत. 'टॉवर'मुख्य गढी-खाली मोठे थोरले तळघरांतले कारागृह आहे. लॉर्ड व लेडी जार्ज ह्यामिल्टन् यांनी आमचे मोठ्या आदरपूर्वक स्वागत केले. त्यांनी प्रथमतः हिंदुस्थानचे 'दुय्यम सेक्रेटरी' व पुढे पुष्कळ वर्षे हिंदुस्थानचे 'स्टेट सेक्रेटरी' या नात्याने काम करून आपल्या देशाची अत्युत्तम सेवा बजाविली आहे. २७३